अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या सातारा येथील घरात चोरी !

सातारा, ७ जून (वार्ता.) – ‘लागीर झालं जी’ या मालिकेमध्ये काम केलेल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिका श्वेता शिंदे यांच्या सातारा येथील घरामध्ये ४ जूनच्या मध्यरात्री चोरी झाली. यामध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० सहस्र रुपये रोख असा ४ लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. खिडकीचे गज कापून ही चोरी करण्यात आली. अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.