पुणे – दुबईहून ५ जून या दिवशी पुण्यात एकजण येत असतांना एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने तो बसलेल्या ठिकाणाची पडताळणी करण्यात आली. त्या वेळी त्याने सोन्याची ‘पेस्ट’ एका सीटमधील एका पाईपमध्ये लपवून आणल्याचे सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांना आढळून आले. त्याच्याकडून १ किलो ८८ ग्रॅम वजनाचे ७८ लाख रुपये किमतीची सोन्याची पेस्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केली आहे. या प्रकरणी एका प्रवाशाला कह्यात घेण्यात आले असून सीमा शुल्क विभागाने संबंधित प्रवाशावर गुन्हा नोंद केला आहे.