गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याच्या कार्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम पुणे येथे पार पडला !

प्रतीकात्मक चित्र

पुणे, २ नोव्हेंबर (वार्ता.) – कात्रज, कोंढवा रोड येथील विद्यानगर येथे गोरक्षा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम २८ ऑक्टोबर या दिवशी पार पडला. गोमातेच्या संरक्षणाची चळवळ महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी गोरक्षा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राहुल कदम, गोरक्षक राकेश शुक्ला आणि व्यावसायिक ऋषिकेश कामठे आणि गोरक्षा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अन् गोरक्षक उपस्थित होते. या कार्यालयाचे उद्घाटन मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आले, तर या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वाती मोहोळ यांनी गोरक्षकांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील वाढती गोहत्या थांबवण्यासाठी गोरक्षा सामाजिक संस्थेचे गोरक्षक महाराष्ट्रभर कार्यरत रहातील, असे गोरक्षा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश कामथे यांनी सांगितले.