बेंगळुरू – जुलै २०२२ मध्ये संपूर्ण कर्नाटक राज्याला हादरवून सोडणार्या भाजपच्या युवा मोर्चाचे प्रमुख प्रवीण नेट्टारू यांच्या निर्घृण हत्येत सहभागी असलेला आणखी एक आरोपी रियाज याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) अटक केली आहे. अटक झालेला आरोपी रियाज युसफ हारळ्ळी विदेशात पसार होण्याचा प्रयत्न करत असतांना मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे. रियाज याच्या अटकेने या प्रकरणात आतापर्यंत एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.