रक्त अहवाल फेरफार प्रकरणात दोघांचा सहभाग
पुणे – येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे अहवाल पालटण्यात आले. रक्ताच्या अहवालाचे धागेदोरे मुंबईशी जोडले गेले आहेत. पुणे पोलिसांनी मुंबईतून दोघांना अटक केली आहे. रक्त अहवाल फेरफार प्रकरणात अशपाक मकानदार, अमर गायकवाड या दोघांचा सहभाग असून त्यांना पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.