पंतप्रधान मोदी यांचा प्रशासनाला आदेश
नवी देहली – रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्युत् सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबवा, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकार्यांना दिला. देशात सध्या उष्णतेची लाट आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना घडून त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ जून या दिवशी प्रशासकीय अधिकार्यांसमवेत बैठक घेतली आणि त्यांना वरील आदेश दिला.
📌PM Modi instructs the administration to regularly inspect electrical safety in hospitals and public places.
Why does the administration need to be explicitly instructed about such basic precautions to be taken? Why doesn’t it occur to the authorities to act by themselves ?… pic.twitter.com/xFmH84cdUO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2024
संपादकीय भूमिकाहे प्रशासनाला सांगावे का लागते ? स्वतःला कळत का नाही ? |