MP Road Accident : मध्यप्रदेशात ट्रॅक्टर ट्रोली उलटून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू

राजगड (मध्यप्रदेश) – राजगड जिल्ह्याच्या पिपोडी येथे २ जूनच्या रात्री ट्रॅक्टर ट्रोली उलटून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १५ जण घायाळ झाले. मृतांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश आहे. २ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

राजस्थानमधून ४० ते ५० वर्‍हाडी मध्यप्रदेशमध्ये लग्नासाठी येत असतांना हा अपघात झाला.