पुणे येथे शनिवारवाडा परिसरात बेवारस पिशवी आढळली !

बाँबची अफवा पसरल्याने पोलिसांकडून अन्वेषण चालू !

पुणे – शनिवारवाड्यात एक बेवारस पिशवी आढळून आली. बाँबची अफवा पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. शनिवारवाडा परिसराची बाँबशोधक आणि नाशक पथकाकडून पडताळणी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दृष्टीने पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.