मुंबई – अभिनेते सलमान खान यांना ठार मारण्याच्या कटात बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सलमान खान यांच्या गाडीवर आक्रमण करण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे.
बिश्नोईचा मोठा भाऊ अनमोल आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार यांनी पाकिस्तानच्या बेकायदा शस्त्र विक्रेत्याकडून एके ४७, एम् १६ यांच्यासह अत्याधुनिक बंदुका खरेदी केल्या होत्या. तेथून त्या महाराष्ट्रात पाठवण्यात येणार होत्या. सलमान खान यांच्या गाडीवर किंवा त्यांच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर हे आक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.