बिहारमध्ये सर्वाधिक ४४ जणांचा मृत्यू
नवी देहली – देशात उष्णतेच्या लाटेमुळे ६ राज्यांत आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला. त्यांतील सर्वाधिक ४४ लोकांचा मृत्यू बिहारमध्ये झाला आहे. यानंतर ओडिशातील राउरकेलामध्ये १०, राजस्थानमध्ये ५, झारखंडमध्ये ४, तर उत्तरप्रदेश आणि देहली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ५ दिवसांत काही राज्यांमध्ये तापमान २ ते ४ अंश अल्प होऊ शकते. यात जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, देहली, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे.
केरळमध्ये मोसमी पावसाला प्रारंभ
केरळमध्ये मोसमी पावसाला ३० मे पासून प्रारंभ झाला आहे. यासमवेतच अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणीपूर आणि आसाम या राज्यांमध्येही पावसाला प्रारंभ झाला आहे.