|

बिदर (कर्नाटक) – येथील गुरुनानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयात २९ मे या दिवशी नाटकाचा सराव चालू असतांना ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देण्यात आल्याने मुसलमान विद्यार्थ्यांच्या गटाने हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण केले. यात नटराज आणि वीरेंद्र हे २ विद्यार्थी घायाळ झाले. ३१ मे या दिवशी महाविद्यालयात होणार्या कार्यक्रमात सादर करण्यात येणार्या नाटकाचा सराव केला जात होता. या हाणामारीमुळे महाविद्यालयात होणारा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे.
१. मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणेवर आक्षेप घेतल्यावर हिंदु विद्यार्थ्यांसमवेत त्यांचा वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांना घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
२. पोलीस अधीक्षक चन्नाबसवण्णा एस्.एल्. यांनी सांगितले की, नटराज याच्या तक्रारीच्या आधारे १७ मुसलमान विद्यार्थी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुसलमान विद्यार्थ्यांकडूनही तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका
|
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड