Chota Rajan : हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला ३१ मे या दिवशी शिक्षा सुनावली जाणार !

मुंबई – हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत (मकोका) कुख्यात गुंड छोटा राजन याला दोषी ठरवले आहे. या खटल्याचा निकाल ३१ मे या दिवशी घोषित केला जाणार आहे. जया शेट्टी यांनी खंडणी न दिल्याने छोटा राजन याने जुलै २००१ मध्ये शेट्टी यांची हत्या केली होती. सध्या अन्य गुन्ह्यांप्रकरणी छोटा राजन देहली येथील तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.