महिलेचा विनयभंग करणार्‍यावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मधील वसुली अधिकारी महिलेचा तहसील कार्यालयात विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल बेलकर याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. त्याने महिलेला ‘तुम्ही पुष्कळ सुंदर दिसता’, असे सांगून भ्रमणभाष क्रमांक मागितला. ‘तुमचे कोणतेही काम अडणार नाही’, असे म्हणून तिला पाण्याची बाटली देण्याच्या बहाण्याने स्पर्श करून छेड काढली.

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना कठोर शिक्षा कधी होणार ?