मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुंबईतील मान्सूनपूर्व कामांची पहाणी !

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ मे या दिवशी मुंबईतील मान्सूनपूर्व कामांची पहाणी केली. मुख्यमंत्र्यांनी कुर्ला-चुनाभट्टी परिसरात येऊन चालू असलेल्या नालेस्वच्छतेच्या कामाची पहाणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.