विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

पुणे – पुण्यात पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. आता आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.