बेळगावमध्ये क्रिकेटच्या वादातून दोन गटात संघर्ष

प्रतिकात्मक चित्र
  • हिंदूंच्या घरांवर दगडफेक      
  • ८ जण घायाळ

बेळगाव – क्रिकेटचे भांडण विकोपाला जाऊन दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याची घटना बेळगाव शहरात घडली. या वेळी हिंदु समुदायाच्या घरांवर दगडफेक करण्यात आली, तसेच अब्दुल नावाच्या व्यक्तीने तलवार दाखवून दहशत निर्माण केल्याची घटना अळ्वाण गल्लीत घडली. या वेळी ८ जण घायाळ झाले. (‘नेहमी केवळ हिंदूंच्याच घरांवर दगडफेक कशी होते ? यासाठी धर्मांध आधीच दगड जमवून ठेवतात का ?’, असे प्रश्न कधी पुरोगाम्यांना पडत नाहीत ! – संपादक) अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बेळगावमध्ये पोलीस आयुक्तांनी अतीदशक्षतेची चेतावणी दिली आहे. कुणीही अफवा पसरवू नयेत, अन्यथा संबंधितांविरुद्द कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.