पोर्शे अपघाताच्या प्रकरणी भक्कम खटला प्रविष्ट करू ! – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

पुणे – कल्याणीनगर भागात पोर्शे गाडी अपघाताच्या प्रकरणी आम्ही न्यायालयाकडे २ अर्ज केले होते. हे दोन्ही अर्ज १९ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने फेटाळून लावले होते; परंतु २२ मे या दिवशी आम्हाला दोन्हीही आघाड्यांवर यश मिळाले. आरोपीला देण्यात आलेल्या जामिनामध्ये पालट करून त्याची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवला जावा, असा अर्ज आम्ही केलेला आहे. न्यायालयाने हा अर्ज विचाराधीन घेतला आहे. यावर २४ मे या दिवशी सुनावणी होईल. आम्ही या प्रकरणी सखोल अन्वेषण करून एक भक्कम खटला प्रविष्ट करू, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. (अशी जागरुकता प्रत्येक खटल्यात दाखवावी, ही अपेक्षा ! – संपादक)