पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि चालक यांची चौकशी

अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (मध्यभागी)

पुणे – येथील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल, तसेच वाहनचालक यांचीही पोलीस चौकशी केली. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांचीही एकाच वेळी चौकशी करणार आहेत. जबाबात एकसूत्रता आहे का ? हे पहाण्यासाठी तिघांची चौकशी केली जाणार आहे. अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते.

सकाळी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना बोलवण्यात आले होते. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता या अपघाताच्या वेळी गाडीत उपस्थित असलेल्या गंगाराम पुजारी या वाहनचालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले.