पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !
पुणे – येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवा साधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत ९०.६७ टक्के गुण मिळाले आहेत. ती पुणे येथील ‘फर्ग्युसन’ महाविद्यालयात शिकते. ‘गणित’ या विषयात तिला १०० पैकी ९७ गुण, तसेच ‘कॉम्प्युटर सायन्स’ या विषयात २०० पैकी १९० गुण मिळाले आहेत. कु. आर्या हिचे वडील श्री. महावीर श्रीश्रीमाळ हे पूर्णवेळ धर्मप्रचाराचे कार्य करतात. कु. आर्या हिची आई सौ. मानसी श्रीश्रीमाळ यांनी तिला अभ्यासात मार्गदर्शन केले. ‘अल्प कालावधीत अभ्यास करूनही देवाच्या कृपेने अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. अभ्यास करतांना नियमित प्रार्थना होत असल्याने अभ्यासासाठी लाभ झाला’, असे कु. आर्या हिने सांगितले.