प्रसिद्धी मिळवून देण्याचे आमीष दाखवून रिहानकडून अनेक हिंदु मुलींची फसवणूक !

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे रिहान नावाच्या मुसलमान तरुणाने सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवून देण्याचे आमीष दाखवून हिंदु मुलींना फसवल्याची घटना समोर आली आहे. रिहान मुलींना यू ट्यूबवर प्रसिद्धी मिळवून देण्याचे आमीष दाखवत असे. २० मे २०२४  या दिवशी आरोपी रिहान याने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. मुलीचे अपहरण झाल्याचे कळताच पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, २० मे या दिवशी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांची १३ वर्षांची मुलगी काही वस्तू घेण्यासाठी दुकानात गेली होती. वाटेत तिला रिहान भेटला आणि तो तिला समवेत घेऊन पसार झाला. या कटात आणखी ३ लोक सहभागी असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. काही वृत्तसंस्थांनी रिहानचे नाव झीशान असे असल्याचे म्हटले आहे. तो हिंदु मुलींना लक्ष्य करून त्यांना त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही तो असून नसल्यासारखाच आहे, हेच लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवरून लक्षात येते ! त्यामुळे हा कायदा आणखी कठोर करण्याची आणि त्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे !