गुरु कसा असावा ?

भारताचार्य सु.ग. शेवडे

१. गुरु चैन आणि विलास यांत लोळणारा नसावा. तो विरक्त असावा.

२. लोकेषणा, वित्तेषणा आणि दारेषणा (पत्नीची अभिलाषा) या ईषणात्रयीतून तो मुक्त असावा.

३. तो आत्मज्ञानी असावा.

४. आणखी एक गमक, म्हणजे गुरूंनी केलेला उपदेश शास्त्रमार्गीच असावा. हीच गुरुत्वाची मुख्य गुरुकिल्ली !

– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (बॅटनरूज ११.७.१९८०)


चमत्कार

‘ज्याचा कार्यकारणभाव आपल्या बौद्धिक क्षमतेला लक्षात येत नाही, तो चमत्कार ! कोणतेही कार्य कारणाविना नसते. ते कारण आपल्याला कळत नाही वा तसे आपल्याला जमत नाही; म्हणून आपल्याला एखादी घटना, चमत्कार-स्वरूप वाटते.’

– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (बॅटनरूज ११.७.१९८०)