केजरीवाल यांना धमकी देणार्‍या आरोपीला अटक !

अंकित गोयल

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी देणारा संदेश लिहिणार्‍या अंकित गोयल नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणाने देहली मेट्रो रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये धमकीचे संदेश लिहिले होते.