वेदांत अग्रवालची बालसुधारगृहात रवानगी

  • वेदांत अग्रवालचा जामीन रहित

  • बाल न्याय मंडळाचा निर्णय

पुणे – वेदांत अग्रवालला आधी दिलेला जामीन रहित करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याचा निर्णय बाल न्याय मंडळाने दिला. हा मुलगा अल्पवयीन कि सज्ञान ? हे पोलीस तपासानंतर ठरवण्यास मंडळाने सांगितले आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत वेदांत याला बालसुधारगृहात रहावे लागेल. बाल न्याय मंडळापुढे सुमारे ८ घंटे चाललेल्या अधिवक्त्यांच्या युक्तीवादानंतर हा निर्णय मंडळाने दिला आहे. पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले होते; पण तरीही बाल न्याय मंडळाने आरोपीस जामीन संमत केला होता. त्यानंतर पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे पुनरावलोकन याचिका प्रविष्ट केली होती.