‘ॲटमॉस्फियर म्युझिक’ असा गोंडस शब्द वापरून पबचा व्यवसाय !

मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा परिसरांत ७० पब असल्याचे उघडकीस !

पुणे – मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, विमाननगर, खराडी या परिसरात सुमारे ७० पब असल्याचे समोर आले आहे. ‘ॲटमॉस्फियर म्युझिक’ हा शब्द वापरून पबचा व्यवसाय केला जात आहे. पब, मद्य, हुक्का, गांजा, ड्रग्स (अमली पदार्थ) सहजपणे उपलब्ध असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. आयटी आस्थापने, उच्चभ्रू महाविद्यालयातील विद्यार्थी यांना समोर ठेवून व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय वाढवले आहेत. हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. या पब संस्कृतीमुळे नगर रस्ता परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी पोलिसांवरच थेट आरोप केले आहेत की,  अनेक ठिकाणी पोलीसच चालकांची राखण करतात. काही ठिकाणी पोलीसच भागीदार असल्यामुळे अवैध धंदे बंद कसे होतील ? मुंढव्यातील काही पबला राजकीय पाठबळ आहे, असेही नागरिकांनी सांगितले. वाढत्या पबमुळे अल्पवयीन मुले व्यसनांच्या आहारी जात असून अपघातांच्या घटना घडत आहेत.

संपादकीय भूमिका

  • एवढ्या मोठ्या संख्येत पब कसे उभे राहिले ? महापालिकेचे अधिकारी झोपले होते का ?
  • तरुण पिढीला मद्यपी बनवणार्‍या पब प्रकरणी संबंधितांची चौकशी झाली पाहिजे !