Accused Threatening Kejriwal Arrested : मुख्यमंत्री केजरीवाल यांना धमकी देणार्‍या आरोपीला अटक !

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी देणारा संदेश लिहिणार्‍या अंकित गोयल नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणाने देहली मेट्रो रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये धमकीचे संदेश लिहिले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

आरोपीने या संदेशामध्ये केजरीवाल यांना देहली सोडण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास त्यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या तीन थप्पडांची आठवण करून दिली आहे. त्यांच्या निवासस्थानावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याविषयीही त्यात लिहिले आहे.