Eyes Removed During Autopsy : बदायू (उत्तरप्रदेश) येथे मृत महिलेल्या शवविच्छेदनाच्या वेळी डोळे काढून घेणार्‍या डॉ. आरिफ आणि डॉ. ओवेस यांना अटक

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील सिव्हिल लाईन्स परिसरात एका विवाहितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांनी तिच्या मृतदेहाचे दोन्ही डोळे काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. मुळात अवयव दान करतांना मृताच्या कुटुंबियांची अनुमती घ्यावी लागते. तसे या महिलेल्या संदर्भात घडले नाही. मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी डॉ. आरिफ आणि डॉ. ओवेस यांना अटक केली आहे. ‘या प्रकरणामध्ये इतर काही वैद्यकीय कर्मचार्‍यांचाही सहभाग आढळला आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारी मानसिकता असणारे कितीही शिकले, तरी ही मानसिकता नष्ट होत नाही, हे यातून लक्षात येते !