Jaunpur Atala Masjid Court:जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील अटाला मशिदीवर हिंदूंकडून न्यायालयात दावा !

पुराव्यांच्या आधारे पूर्वीचे देवीचे मंदिर असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे !

जौनपूर (उत्तरप्रदेश) – गेल्याच आठवड्यात राज्यातील आगराजवळ असलेल्या फतेहपूर सिकरी येथील दर्ग्याच्या ठिकाणी देवीचे मंदिर असल्याचा दावा करत हिंदूंनी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. आता राज्यातील जौनपूर येथील दिवाणी न्यायालयात येथील अटाला मशीद मूळचे ‘माता मंदिर’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. जौनपूरच्या या मशिदीच्या भिंतींवर मंदिराशी संबंधित अनेक धार्मिक चिन्हे असल्याचे सांगितले जाते. यामध्ये त्रिशूळ, फुले आणि इतर हिंदु कलाकृती यांचाही समावेश आहे.

आगरा येथील अधिवक्ता अजय प्रताप सिंह यांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. त्यांनी उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अटाला मशीद व्यवस्थापन समिती यांच्याविरुद्ध दावा केला आहे. ‘ज्याला मशीद म्हणतात, ते खरेतर मातेचे मंदिर आहे’, असे सिंह यांनी सांगितले. विशेष म्हणजे या मशिदीवर हिंदु अनेक वर्षांपासून दावा करत आहेत. प्रथमच हे प्रकरण न्यायालयात पोचले आहे. (ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)

अधिवक्ता सिंह यांनी दाव्याच्या समर्थनार्थ दिलेले संदर्भ !

१. पुरातत्व विभागाच्या संचालकांच्या अहवालात म्हटले आहे की, अटाला माता मंदिर कन्नौजचे राजा जयचंद्र राठौर यांनी बांधले होते, असे मानले जाते. हे मंदिर पाडण्याचा पहिला आदेश फिरोजशाहाने दिला होता; मात्र त्या वेळी हिंदूंच्या संघर्षामुळे ते मंदिर पाडू शकले नाही. पुढे इब्राहिम शाहाने ते कह्यात घेऊन त्याचे रूपांतर मशिदीमध्ये केले.

२. याच अहवालानुसार ‘कलकत्ता स्कूल ऑफ आर्ट्स’चे मुख्याध्यापक ईबी हॅवेल यांनीही त्यांच्या पुस्तकात अटाला मशिदीचे स्वरूप आणि चरित्र ‘हिंदु’ म्हणून वर्णित केले आहे.

३. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अनेक अहवालांमध्ये अटाला मशिदीची चित्रे आहेत. त्यात त्रिशूळ, फुले इत्यादी दिसतात, जी हिंदु मंदिरांमध्ये आढळतात.

४. वर्ष १८६५ च्या ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’च्या जर्नलमध्येही अटाला मशिदीमध्ये कलशाची आकृती असल्याचा उल्लेख केला आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांच्या कह्यात असणार्‍या एकेका धार्मिक इमारतीवर दावा करत बसण्यापेक्षा त्या-त्या राज्यातील भाजपशासित सरकारनेच सूची सिद्ध करून एकत्र न्यायालयीन दावे प्रविष्ट करावेत, असेच हिंदूंना वाटते !
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांना बहुमताच्या जोरावर संसदेत कायदे करून रद्दबातल ठरवणार्‍या तत्कालीन काँग्रेस सरकारने बनवलेला ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’ रहित करणे केंद्रातील भाजप शासनाला अजिबात अवघड नाही. त्याने त्यासाठी पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !