Shri Kashi Vishwanath : श्री काशी विश्‍वनाथ मंदिरात गेल्या ६ वर्षांत दर्शन घेणार्‍या विदेशी नागरिकांच्या संख्येत वाढ !

अमेरिका पहिल्या, तर इटली दुसर्‍या आणि रशिया तिसर्‍या क्रमांकावर !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – श्री काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये भारतियांसमवेत विदेशातून येणार्‍या नागरिकांकडून दर्शन घेण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. यांत अमेरिका पहिल्या, इटली दुसर्‍या, रशिया तिसर्‍या, मलेशिया चौथ्या, तर स्पेन पाचव्या स्थानावर आहे. श्री काशी विश्‍वनाथ मंदिर न्यासाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१९ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत सर्वाधिक, म्हणजे १०.२० टक्के अमेरिकी भाविकांनी श्री काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेतले.

१. इटलीतील भाविकांची संख्या ९.७८ टक्के, रशियातील भाविकांची संख्या ९.६२ टक्के, मलेशियातील भाविकांची संख्या ७.६४ टक्के आणि ५ व्या क्रमांकावर स्पेनमधील भाविकांची संख्या ७.१८ टक्के आहे. फ्रान्समधील भाविकांची संख्या ६.८६ टक्के, नेदरलँड्सच्या भाविकांची संख्या ५.०७ टक्के, जपानमधील भाविकांची संख्या ४.१७ टक्के आणि ब्रिटीश भाविकांची संख्या ४.०२ टक्के होती. याखेरिज ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, बांगलादेश, बेल्जियमसह एकूण १३९ देशांतील भाविकांनी श्री काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेतले.

२. मार्च २०२४ मध्ये श्री काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये रशियातील भाविकांची सर्वाधिक, म्हणजे ९.७५ टक्के इतकी होती. दुसर्‍या क्रमांकावर अमेरिकी भाविकांची संख्या ९.११ टक्के, इटलीच्या भाविकांची संख्या ९.३३ टक्के, मलेशियाच्या भाविकांची संख्या ७.६९ टक्के, फ्रेंच भाविकांची संख्या ६.५६ टक्के, ब्रिटीश भाविकांची संख्या ५.१६ टक्के आहे. नेदरलँडच्या भाविकांची संख्या ५.०४ टक्के, स्पेनच्या भाविकांची संख्या ४.२९ टक्के, तर जपानमधील भाविकांची संख्या ४.१९ टक्के होती.

३. वर्ष २०२३ मध्ये १०.८२  टक्के अमेरिकी भक्त या मंदिरात गेले. यानंतर १०.५४ टक्क्यांसह दुसर्‍या क्रमांकावर इटली, ८.६३ टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर रशिया, ८.१५ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर स्पेन आणि ६.७६ टक्क्यांसह ५ व्या क्रमांकावर फ्रान्सचे भाविक मंदिरात गेले.