पाकव्याप्त काश्मीरमधील हिंसाचारात १ पोलीस ठार !

एका सैनिकाला मारहाण

मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांकडून सरकार, पाकचे सैन्य आणि पोलीस यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये एका पोलिसाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला, तर एका सैनिकाला मारहाण करण्यात आली.

बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

या आंदोलनामुळे १०० हून अधिक लोक घायाळ झाले. पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर, तसेच आझाद जम्मू आणि काश्मीर येथे बाजारपेठ, शाळा अन् कार्यालये सलग दुसर्‍या दिवशी बंद राहिली. पोलिसांनी आंदोलकांच्या निवासस्थानांवर, तसेच मुझफ्फराबाद आणि मीरपूर विभागांतील त्यांच्या नातेवाइकांच्या घरांवर धाड टाकून त्यांना अटक केली.