Shehbaz Sharif Pakistan Economy : (म्हणे) ‘पाकने प्रामाणिकपणे काम केल्यास भारताला अर्थव्यवस्थेत मागे टाकू !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या फुशारक्या

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहजाब शरीफ

इस्लामाबाद – पाकिस्तानने प्रामाणिकपणे काम केल्यास ते भारताला अर्थव्यवस्थेत मागे टाकू शकते, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतेच केले होते. पाकिस्तान गरिबीशी झुंजत आहे. स्वत:ला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (आय.एम्.एफ्.ला) सतत आवाहन करत आहे. असे सअतांना पाकचे पंतप्रधान मात्र भारताशी स्पर्धा करण्याचे स्वप्न पहात आहेत.

शरीफ यांच्या या वक्तव्यानंतर देशात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानच्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी युनिवर्सिटी’मध्ये शिकणार्‍या अब्दुल्ला याने सांगितले की, पाकिस्तान भारताशी स्पर्धा करूच शकत नाही. भारताच्या विकासासाठी तेथील लोकशाही कारणीभूत आहे. स्वातंत्र्यानंतर भारतातील नेत्यांनी लोकशाही वृत्ती अंगीकारून देशाच्या विकासासाठी काम केले. पाकिस्तानने चंद्रावर पोचण्यासाठी मोहीम आखली आहे. त्यासाठी त्याला चीन साहाय्य करीत आहे. दुसर्‍या बाजूला भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उपग्रह उतरवून जगाला त्याची क्षमता दाखवून दिली आहे. ही सर्व सूत्रे पहाता पाकिस्तानने हवेत बोलणे थांबवले पाहिजे.

संपादकीय भूमिका

दिवास्वप्न पहाणार्‍या पाकच्या या वक्तव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?