नाशिक येथील शांतीगिरी महाराजांची वेगवेगळ्या उमेदवारांकडून भेट !

श्री शांतिगिरी महाराज

नाशिक – एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील, तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांनी शांतीगिरी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा मागितला आहे. वर्ष २००९ मध्ये शांतीगिरी महाराज हे दीड लाख मतांनी निवडून आले होते. त्यांचा भक्त परिवार मोठा आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे आज वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी त्यांची भेट घेतली. १० तारखेला ते पाठिंबा घोषित करणार आहेत.