रायपूर – काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधिका खेडा म्हणाल्या, ‘‘मी रामभक्त असल्याने श्री रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर कौशल्या मातेची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्या छत्तीसगडमध्ये माझ्याशी गैरवर्तन करण्यात आले. आजची काँग्रेस महात्मा गांधींची काँग्रेस नाही, ती श्रीरामविरोधी आणि हिंदुविरोधी आहे.’’
Today's Congress is against Shri Ram and anti-Hindu.
– Radhika Khera, Former Spokesperson, #Congress.
राधिका खेडा pic.twitter.com/wLyBE8KeWK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2024
काँग्रेसचे त्यागपत्र दिल्यानंतर राधिका खेडा यांनी सांगितले होते की, छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी त्यांच्या २ सहकार्यांसह रायपूर येथील पक्ष कार्यालयात त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. याविषयी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली असता, आरोपी नेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.