यवतमाळ – एका अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री करणार्या आंतरराज्य टोळीला यवतमाळ पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी आईसह ६ आरोपींचा समावेश आहे. मुलीशी लग्न करणारा शंकरसिंह सोहनसिंह, सत्तार महंमद लोहार, ताज महंमद लोहार, अब्दुल भडमुंजा, अस्लमखा पठाण, ईमल्याजबी पठाण आणि पीडित मुलीची आई अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई ४ मे या दिवशी करण्यात आली. यवतमाळ शहरातील मोमीनपुरा भागातील अल्पवयीन मुलीची १ लाख रुपयांमध्ये विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिका :मुलीची विक्री करण्यामध्ये आईचा हात असणे, हे घोर कलियुग असल्याचे लक्षण ! समाजाला धर्मशिक्षण दिल्यास व्यक्तीची बुद्धी सात्त्विक होऊन अशा प्रकारच्या कृती होणार नाहीत ! |