१. भोगांकडे पहाण्याची साधकाची वृत्ती कशी असावी ?
‘आनंदरस हा विषयाकडेही नेतो, तसेच ब्रह्माकडेही नेतो. ग्रासोग्रासी खाद्यपदार्थ निर्माण करणारा आठवू लागला, तर अन्नरसातून ब्रह्मानंद प्रवाहित होतो. पदार्थातील मसाल्यांची गोडी वाढून जिव्हालौल्य (लालसा) निर्माण झाले, तर विषयरस वाढेल. विषय वैषेयिक भावना वाढवून अध्यात्मापासून परावृत्त करतात. उलट अन्नरसातून ब्रह्मानंदगोडी निर्माण झाली, तर विषयरसांचेही परिवर्तन होऊन ‘विषयानंद’ हाच ‘ब्रह्मानंद’ होईल. प्रत्येक भोगाकडे पहाण्याची साधकाची वृत्ती ही अशी असावी लागते.
२. विषयानंदाचा हेतू आणि त्याचे प्रमाण ब्रह्मानंदगोडीवरच आधारित झाल्यास साधनगोडी वाढणे
विषयानंदाचा हेतू आणि त्याचे प्रमाण ब्रह्मानंदगोडीवरच आधारित झाले की, विषयाविषयी उदासीनता येते आणि विषय भोगूनही साधनगोडी वाढीला लागते. हीच सद्गुरु उपदेशित साधकाची साधनगोडी.’
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)