Trudeau On Nijjar Murder:(म्हणे) ‘कॅनडा कायद्याचे राज्य असलेला देश !’ – पंतप्रधान ट्रुडो

निज्जर हत्याप्रकरणी ३ भारतियांना अटक करण्यात आल्याचे प्रकरण


ओटावा (कॅनडा) –
खलिस्तानी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणी ३ भारतियांना अटक करण्यात आल्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, कॅनडा कायद्याचे राज्य असलेला देश आहे. येथे सशक्त आणि स्वतंत्र न्यायप्रणाली आहे. या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी करनप्रीत सिंह, कमलप्रीत सिंह आणि करण बराड यांना अटक केली आहे.

ट्रुडो पुढे म्हणाले की, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अन्वेषण केवळ या ३ लोकांपर्यंत सीमित नसून ते चालूच रहाणार आहे. शीख समुदायाच्या लोकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे.

संपादकीय भूमिका

अन्य देशांमध्ये राष्ट्रविघातक कारवाया करणार्‍यांना आश्रय देणे हे कायद्याच्या राज्यात चालते का ? दुसर्‍या देशात अशांतता पसरवणे हे कायद्याचे उल्लंघन नाही का ?