परवीन शेख या मुख्याध्यापिकेचा शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पवित्रा !
मुंबई – येथील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी ‘एक्स’वर हमास-इस्रायल संघर्षासंदर्भात हमासविषयी सहानुभूती दाखवणार्या पोस्टला ‘लाईक’ करून त्यावर ‘कॉमेंट’ केले होते. या कारणास्तव शाळा व्यवस्थापनाने त्यांना त्यागपत्र देण्यास सांगितले आहे; परंतु त्यांनी त्यागपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘त्यागपत्र देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. मी लोकशाही असलेल्या भारतात रहात असून मला बोलण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. (अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे आतंकवाद्यांची बाजू घेणे नव्हे ! – संपादक) सोमय्या शाळेच्या कर्मचार्यांनी सार्वजनिकपणे राजकीय विषयांवर टिप्पणी करू नये, असे कोणताही धोरण नाही. मार्च महिन्यात झालेल्या एका बैठकीत कर्मचार्यांना सामाजिक माध्यमांवर त्यांचे विचार मांडण्याची अनुमती असल्याचे सांगण्यात आले होते. मी या शाळेच्या विकासासाठी १०० टक्के प्रयत्न केले.’’
Mumbai school Principal's open support to the #Hamas, rejects resignation orders when asked to step down.
Principal Parveen Shaikh defies school management's demand for resignation
👉 What values will the Principal endorse amongst students when she condones terrorists with… pic.twitter.com/o7mCeTSJ08
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2024
परवीन शेख या मागील १२ वर्षांपासून या शाळेत काम करत असून गेल्या ७ वर्षांपासून शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि अन्य एक संकेतस्थळ येथे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर शाळेने त्यांना त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ‘हा निर्णय आमच्यासाठी कठीण असल्याचे’ही शाळा व्यवस्थापनाने सांगितले.
संपादकीय भूमिका
|