|

इंदूर (मध्यप्रदेश) – इंदूर शहरातील खजराना पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी ७ जणांनी हिंदु धर्म स्वीकारला होता. यानंतर यांच्यापैकी एक असलेल्या हरिनारायण (पूर्वाश्रीमीचा हैदर) या तरुणाच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. यात त्याच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. हरिनारायण याला ठार मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. अशा परिस्थितीत घाबरलेल्या हरिनारायण याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संरक्षणाची मागणी केली.
Stones Pelted Harinarayan House : हिंदु धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण
📍#Indore (मध्यप्रदेश)हरिनारायण याला ठार मारण्याची धमकी !
मध्यप्रदेशात #BJP चे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! https://t.co/rGjQBlZ8pK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2024
या तक्रारीविषयी पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे प्रांत संपर्क प्रमुख संतोष शर्मा यांनी सांगितले की, या धमकीबद्दल सांगायचे, तर ही धमकी महाराष्ट्रातील एका इस्लामी संघटनेने दिली आहे. तेथून धमकीचे पत्र देण्यात आले आहे. यामध्ये हरिनारायणला ‘काफिर’ म्हटले आहे. आम्ही आमचे काम करत आहोत आणि करत राहू. हिंदु धर्मात आणण्याचे काम चालू राहील. धमकी देणार्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! |
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक