Xenophobia : भारत आणि जपान यांना निर्वासितांची भीती वाटते ! – अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन – भारत आणि जपान या देशांना ‘झेनोफोबिया’ म्हणजेच स्थलांतरितांची भीती वाटते. त्यामुळेच हे देश आर्थिकदृष्ट्या विकसित होऊ शकत नाहीत, असे बिनबुडाचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी निर्वासित असणे चांगले आहे, असा युक्तीवादही बायडेन यांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निधी उभारणीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आम्ही स्थलांतरितांचे स्वागत करतो; म्हणून आम्ही पुढे जात आहोत.’

निर्वासितांच्या विरोधात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा बायडेन यांच्याकडून निषेध !

नोव्हेंबरमध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अनेक अमेरिकन मतदारांमध्ये निर्वासित, हा एक प्रमुख चिंतेचा विषय असल्याचे अनेक सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. जो बायडेन यांनी त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्वासितांविषयीच्या भूमिकेचा निषेध केला.

संपादकीय भूमिका

भीती आणि धोका यांतील मूलभूत भेदही ठाऊक नसणार्‍यांनी भारताच्या भूमिकेविषयी न बोलणेच शहाणपणाचे ठरेल !