वॉशिंग्टन (अमेरिका) – खलिस्तानी आतंकवादी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सतिवंदर सिंह उपाख्य गोल्डी ब्रार याची हत्या झाल्याचे वृत्त खोटे असल्याची माहिती अमेरिकेच्या पोलिसांनी दिली.
अमेरिकेतील फ्रेस्नो पोलीस विभागाचे लेफ्टनंट विल्यम जे. डूली म्हणाले की, १ मे या दिवशी फ्रेस्नो परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. यात २ जण घायाळ झाले होते. यातील एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही व्यक्ती गोल्डी ब्रार नाही. या व्यक्तीचे नाव झेवियर गॅलाडनी (वय ३७ वर्षे) आहे. आमच्याकडे जगभरातून गोल्डी ब्रारविषयी चौकशी होत आहे. त्याच्या मृत्यूची खोटी बातमी सामाजिक माध्यमातून पसरवण्यात आली. हे कुठून आणि कुणी चालू केले ? हे आम्हाला ठाऊक नाही.