उडुपी (कर्नाटक) येथे ईस्माईल अतिक याच्याकडून बसचालकावर चाकूद्वारे आक्रमण !

बसचालकाने चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हर टेक’ केल्याचा आरोप

उडुपी (कर्नाटक) – येथील एका बसचालकाने ईस्माईल अतिक नावाच्या व्यक्तीच्या चारचाकीला चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हर टेक’ केल्याचा दावा केला आहे.  यामुळे चिडलेल्या अतिक याने बसचा माग घेतला आणि पडूबिद्री येथे बसला गाठले. बसमध्ये घुसून त्याने चालकावर चाकूद्वारे आक्रमण केले. (अशांकडे चाकू आला कुठून ? याची चौकशी पोलीस करणार का ? – संपादक) शैलेंद्र उपाख्य शैलू असे बसचालकाचे नाव असल्याचे समजते. ही घटना २९ एप्रिलच्या सकाळी घडली.

या घटनेच्या संदर्भात पडूबिद्री पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. अतिकने आरोप केला की, बसचालक आणि वाहक यांनी त्याच्यावर ‘स्क्रू ड्राईव्हर’ने आक्रमण केले.