नाशिक येथे पिस्तुल घरी घेऊन गेल्याच्या कारणावरून पोलीस नाईक यांना सक्तीने निवृत्त होण्याचा आदेश !

नाशिक – साप्ताहिक सुटीच्या दिवशी अनुमती न घेता स्वतःची सर्व्हिस पिस्तुल घरी घेऊन जाणारे पोलीस नाईक संजय भोये यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सक्तीची निवृत्ती दिली आहे. (पोलीस नियम पाळत नसतील, तर अशा पोलिसांना ही दिलेली शिक्षा योग्य आहे. यातून इतर पोलीस धडा घेतील, ही अपेक्षा. – संपादक)

संजय भोये हे उपनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असतांना २१ जून २०१९ या दिवशी साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे २० जून २०१९ या दिवशी काम संपल्यानंतर त्यांच्याकडे असलेले पिस्तुल पोलीस ठाण्यातील कारकुनाकडे जमा करणे आवश्यक होते; मात्र त्यांनी तसे न करता पिस्तुल घरी नेले. याची गंभीर नोंद घेता विनाअनुमती पिस्तुल बाळगल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ चा भंग केल्याचा ठपका भोये यांच्यावर ठेवण्यात आला.

या निर्णयाविषयी त्यांना ६० दिवसांच्या आत महासंचालक कार्यालयाकडे दाद मागता येणार आहे.