आनंदी जीवन जगण्यासाठी नामजपासह स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जयपूर (राजस्थान) येथील शाळेत ‘तणावमुक्ती’ विषयावर प्रवचनाचे आयोजन 

जयपूर (राजस्थान) – स्वतःची सर्व धावपळ सुख मिळवण्यासाठी, म्हणजे आनंदप्राप्तीसाठी चाललेली असते; परंतु प्रतिदिन आपण विविध कारणांमुळे तणावग्रस्त असतो. तणावासाठी आपण बाह्य परिस्थिती किंवा एखादी व्यक्ती यांना दोष देत असतो. वास्तविक आपण जीवनात स्वत:त पालट घडवण्यासाठी योग्य प्रयत्न करून तणावमुक्त होऊ शकतो. त्यासाठी आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे नामसाधनेसह आपल्यातील दोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आनंदमय जीवन कसे जगायचे, यासाठी सनातन संस्था मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी येथील ‘गगन भारती पब्लिक सिनियर सेकेंडरी स्कूल’मध्ये आयोजित ‘तणावमुक्ती कार्यशाळे’त केले. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या दीप्ती गुप्ता, विद्यालयाचे संचालक श्री. चंद्रमोहन गुप्ता, तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी ‘योग पीस संस्थे’चे संचालक योगी मनिषभाई यांनी योगाचे महत्त्व सांगितले.