प्राचीन भारतीय मंदिरांचे अद्भुत स्थापत्य !

तरंगत्या दगडांपासून बनवलेले आंध्रप्रदेशातील रामप्पा मंदिर !

आंध्रप्रदेशातील पालमपेट गावातील ‘रामप्पा’ मंदिर रामसेतूत वापरलेल्या दगडांप्रमाणे असलेल्या दगडांनी बनवलेले आहे. वर्ष १२१३ मध्ये काकतीय वंशाचे महाराज गणपति देव यांनी मंदिराचा शिल्पकार रामप्पा याचेच नाव या मंदिराला दिले. या भागातील इतर समकालीन मंदिरे आणि इमारती भूकंपामुळे जीर्ण झाल्या आहेत; परंतु भूकंपाच्या प्रभावातही हे मंदिर अबाधित आहे.

मंदिराचे दगड पाण्यात टाकल्यावर ते बुडण्याऐवजी तरंगत होते. तेव्हा पुरातत्व शास्त्रज्ञांना मंदिराच्या ताकदीचे रहस्य उलगडले. भूकंपात कठीण दगड पृष्ठभागावरील कंपनामुळे ते तुटले होते; पण रामप्पा मंदिरातील दगडांचे वजन पुष्कळ अल्प असल्याने मंदिर भूकंपाला तोंड देत उभे राहिले; मात्र आजपर्यंत शास्त्रज्ञांना या दगडांचे रहस्य कळलेले नाही की, हे दगड कुठून आणले गेले किंवा ते कोणत्या तंत्रज्ञानाने बनवले गेले ? कारण हे दगड जगात कुठेही नैसर्गिक स्वरूपात आढळत नाहीत. रामप्पा मंदिरात जडलेला वाळूचा दगड मानवनिर्मित असल्याचेही मानले जाते.

तांत्रिक तपासाच्या वेळी शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, हे दगड बनवण्यासाठी आयताकृती खंदक निर्माण करण्यात आला होता; ज्यामध्ये ग्रॅनाइट दगडाची पूड, उसापासून सिद्ध केलेली साखर, नदीची वाळू आणि इतर काही संयुगे टाकून मिश्रण सिद्ध केले होते. या मिश्रणाने पाया भरून वेगवेगळ्या आकाराचे सच्छिद्र दगड निर्माण केले. जेव्हा हे दगड पायथ्याशी आणि भिंतींना जोडले गेले, तेव्हा त्यांच्यामध्ये एक अंतर ठेवले गेले, जसे रेल्वे ट्रॅकमध्ये ठेवले जाते. असे म्हटले जाते की १ एप्रिल १८४३ या दिवशी या भागात भूकंप झाला, तेव्हा आजूबाजूच्या इमारती कोसळल्या; परंतु मंदिर सुरक्षित राहिले. खरे तर, या अद्वितीय बांधकाम तंत्रामुळे, पाया आणि आयताकृती पायामध्ये भरलेले सच्छिद्र आणि कमी वजनाचे मिश्रण भूकंपाची कंपने ते शोषून घेते.

सध्या जवळपास अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत. श्रीराम मंदिराच्या पायाभरणीतही असेच तंत्रज्ञान वापरले जात आहे.

(विश्व संवाद केंद्र भारत यांच्या संकेतस्थळावरन साभार)


सर्वांत मोठे प्राचीन हिंदु मंदिर अंकोरवाट !

अंकोरवाट हे मंदिर भारतापासून ४ सहस्र कि.मी. दूर असलेल्या कंबोडिया देशातील आहे. येथे प्राचीन काळी हिंदूंची वस्ती असलेल्या राजा सूर्यबर्मन दुसरा याच्या कारकीर्दीत बांधले गेले. १२ व्या शतकातील हिंदूंचे हे सर्वांत मोठे मंदिर अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकला यांचा नमुना आह. येथे १ सहस्र ५०० स्तंभांहून अधिक स्तंभ आहेत. अत्यंत सूक्ष्म, बारीक, अतिशय सुबक आखिव-रेखिव कोरीवकाम केलेले, विविध कृती करणारे प्राणी, पक्षी, लता, वेली, यावर आहेत. येथील खांब, भिंत यांचा इंचभरही ही भाग मोकळा सोडलेला नाही. एखाद्या छोट्या भागातही अनेक योद्धे वेगवेगळी शस्त्र चालवत आहेत, सहस्रो सैनिक युद्ध करत आहेत, असे चित्रण प्रचंड लांब भिंतीवर आहे. युद्धमैदानातील अराजक युद्ध येथे कोरले आहे. सहस्रो वेगवेगळ्या नक्षी येथे आहेत. ४०० एकरमध्ये एकाही नक्षीची द्विरुक्ती नाही. सुंदर नक्षीच्या लाकडी चौकटी आहेत. जे पाहू शकतो, तेवढ्यावरच पूर्वजांनी नक्षीकाम केले आहे. दरवाजाचा आतील भाग जो पाहू शकत नाही, त्यावर केली नाही. यासाठी उन्नत तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता होती, जे त्यांच्याजवळ होते.


खानदेशातील जंजणीदेवीच्या आवारातील काही शतकांपूर्वीची ३१ फूट उंचीची दीपमाळ प्रतिदिन हालवता येणे !

सातवाहनकालीन कलाकारांना तरंगणार्‍या विटा बनवण्याची कला अवगत होती, हे त्या काळातील महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या अवशेषांवरून स्पष्ट होते. सातवाहनकालीन अवशेष आणि संदर्भ खानदेशातील म्हसवे (तालुका पारोळा) येथे मिळतात. येथील विटा तरंगणार्‍या होत्या, असे मत काही जुन्या शास्त्रज्ञांनी मांडले आहे. येथील जंजणी देवीच्या आवारात ३१ फूट उंचीची दीपमाळ आहे. तिला चुन्याचा गिलावा दिला आहे. या दीपमाळेचा खालचा घेर साधारणतः १२ फूट असावा. ही दीपमाळ षट्कोनी असून वरच्या बाजूस निमुळती होत गेली आहे. देवळाच्या समोर पूर्वेस तलावाकाठी दोन दीपमाळा आहेत. यांपैकी एक दीपमाळ हलते. विटा आणि चुना यांनी बनवलेले ३१ फूट उंचीचे बांधकाम हालवण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल ? असले पक्के बांधकाम टिकणार नाही, हे खरे; परंतु ही दीपमाळ हालते आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून हे घडत आहे. एका दीपमाळेवर चढून दुसरीला धक्का दिला की, ती दीपमाळ हलते. काही शतकांपूर्वीची ही दीपमाळ प्रतिदिन हालवली जाते; परंतु तिला तडा गेला नाही कि तिचे बांधकामही भंगलेले नाही !

अशा या अज्ञात कलाकाराच्या कलेची हातोटी आणि कौशल्य यांचा शोध घ्यायला हवा. त्याची शास्त्रीय मीमांसा व्हायला हवी. यासाठी आमच्या बांधकाम तज्ञांना वेळ नाही आणि इच्छाही नाही. केवळ पाश्चात्त्यांच्या उष्ट्या तत्त्वज्ञानाचा टेंभा मिरवणे एवढेच त्यांचे काम आहे. याचा शोध घेणार्‍या श्री. गो.ग. जोशींना साहाय्यक मिळत नाही, तोपर्यंत ही हालती दीपमाळ हालतच रहाणार आणि कलाकाराच्या कलेला प्रतिसाद देत एक दिवस आपल्या वैशिष्ट्यांसह आपल्यासमवेत गूढ घेऊन नष्ट होणार.

– प्र.रा. अहिरराव (अक्कलकोट स्वामी दर्शन)


नाशिकचे काळाराम मंदिर !

‘पंचवटी (नाशिक)च्या काळाराम मंदिरात दूरच्या महाद्वारातून, तसेच सभामंडपातील कोणत्याही स्तंभाजवळून गाभार्‍यातील मूर्तीचे संपूर्ण दर्शन घडावे, अशी कुशल योजना आहे; इथले मंदिर उच्च सौंदर्याचे आणि ऐश्वर्याचे आहे. वर्षाच्या ठराविक दिवशी उगवत्या आणि मावळत्या सूर्याची किरणे गाभार्‍यातील मूर्तीवर पडावीत, अशी योजना आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित ऑक्टोबर २०१०)

नाशिकच्या काळाराम मंदिराचे स्थापत्य !

२ सहस्र ७०० वर्षांपूर्वी स्वयंभू राममूर्ती गोदावरीच्या रामतीर्थामध्ये प्राप्त झाली आहे. सगळीकडे कोदंडधारी राम असतो, येथे रामाचा हात त्याच्या अनाहतचक्रावर आहे. राक्षसांसाठी काळ ठरलेला म्हणून का ‘काळा’राम आहे.

दगड रामशेज किल्ल्याचा दगड दूध आणि नवसागर यात उकळून हे मंदिर बांधले आहे. हेमाडपंथी देवालयात ४ दरवाजे हे वेदस्वरूप आणि आतील ४ दरवाजे हे उपवेदांचे प्रतीक आहेत. मंदिरात एकूण ८४ कमानी या ८४ लाख योनींचे प्रतीक आहेत. हनुमानच्या मंदिराचे ४० खांब हे हनुमानचालिसा किंवा यजुर्वेदातील ४० अध्याय आहेत, म्हणजे जणू वेद भगवंताच्या स्तुतीसाठी उभा आहे ! मंदिराची ३ शिखरे ही रज-तम आणि सत्त्व गुणाचे प्रतीक आहे. १४ पायर्‍या या प्रभु रामचंद्रांनी १४ वर्षे भोगलेल्या वनवासाचे प्रतीक आहेत. स्वामी रामचंद्र १४ भूवनांचे स्वामी आहेत. १४ विद्या आहेत, ज्यांना येतात, त्यांना रामचंद्राचे दर्शन होते. ८ खांबावर उभी मेघडंबरी हे अष्टांग योगाचे प्रतीक आहे. दिगंभट्ट महाराज यांनी या मंदिराचे स्थापत्य केले होते. घुमुटावर १ सहस्र पाकळ्यांचे कमळ आहे. ज्ञान प्राप्त झाल्यावर मस्तकाच्या ठिकाणी उमलेल्या कमणाचे प्रतिक आहे.

(मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास महाराज यांच्या चित्रफीतीतील मुलाखतीतून साभार)


जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा येथील लेणी !

१२०० वर्षांपूर्वी अजंठा आणि वेरूळ ही लेणी बांधली गेली. वरूळचे लेणे हेही कर्करेषेवर पूर्व आणि पश्चिम १ डिगरीचेही अंतर रहाणार नाही अशा जागी उभे आहे. येथे काही वर्षांपूर्वी नव्याने २२ गुफांचा शोध लागला, ज्यात शैव संप्रदायाच्या लेण्या आहेत. कैलास लेणे हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नजराणा आहे. वर्ष ७२७ मध्ये हे लेणे बांधण्यात आले. येथील लेण्यांचे बांधकाम कळसापासून चालू करून म्हणजे वरपासून डोंगररांगांचा दगड फोडून खाली मंदिर बांधत आणले आहे, हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. औरंगजेबाने अनेक आक्रमणे करूनही त्याला हे मंदिर उद्ध्वस्त करता आले नाही. येथे शिल्पकलेप्रमाणेच उल्लेखनीय चित्रकला आहे. याचे रंग अजूनही गेलेले नाहीत.

अजंठा येथे २९ लेण्या विस्तीर्ण डोंगररांगांत कोरल्या गेल्या आहेत. वाघुर नदीच्या परिसरात ३ र्‍या ते शतकापासून ७ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची माहिती देण्यासाठी कोरल्या. येथे ४ चैत्यसभागृह आणि अन्य विहार आहेत. २ शतके तरी येथे कारागीर काम करत असावेत. हे दगड फोडून बाहेर येणारा लक्षावधी टन मलबा हा कित्येक वर्षे काढला तरी संपणार नाही, असा होता. तो येथील नुसताच बाहेर काढण्यात आलेला नाही, तर तो आजूबाजूलाही फेकलेला दिसत नाही, हेही आश्चर्य आहे.


राजस्थानमधील रणकपूर येथील १ सहस्र ४४४ खांबांचे मंदिर !

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रणकपूर येथील रनकपूर येथे १ सहस्र ४४४ खांबांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले हे जैन मंदिर आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे. असे म्हणतात की, एक खांब अर्धवट आहे आणि तो बांधला की परत सकाळी तुटतो.

असेही म्हणतात की, अशा प्रकारे बांधले आहे की, यातील एक जरी खांब काढला तरी देऊळ बांधलेच जाऊ शकणार नाही ! अत्यंत गुंतागुंतीच्या नक्षी, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. १५ व्या शतकात राणा कुंभा याच्या शासनकाळात हे मंदिर बांधण्यात आले.


अतीप्रगत विज्ञानाची झलक दाखवणारे तमिळनाडूतील पंचवर्णस्वामी मंदिर !

सायकलवरील माणूस

२ सहस्र वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या पंचवर्णस्वामी मंदिरात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आहेत. येथे पंख असलेली आई बाळासमवेत उडण्याच्या सिद्धतेत आहे, तसेच पंख असलेली आणि हत्तीचे तोंड असलेली पक्षासारख्या पायांची स्त्री आहे. आतापर्यंत विज्ञानातील ‘जेनेटिक तंत्रज्ञानाला’ही अशा प्रकारे प्रजाती निर्माण करणे शक्य झालेले नाही; परंतु १०० ते २०० वर्षांनी ते शक्य आहे, असे विज्ञान सांगते. हेच नेमके येथे दिसते. ५ दशलक्ष वर्षांपूर्वी, अतीप्राचीन काळात आढळणारी आणि लुप्त झालेली मोठे दात आणि शेपूट असणारी प्राण्याची थायलकॉसमलस ही वाघासारखी दिसणारी प्रजाती येथे कोरलेली आहे. या मंदिरात भविष्य आणि भूत काळातील प्रजातींच्या आकृत्या कोरलेल्या आहेत, हे लक्षात येते. वेळेचा प्रवास (टाईम ट्रॅव्हल) आणि वेळेचे परिमाण (टाईम डायमेंशन) याची उदाहरणे भागवतपुराणासारख्या हिंदु ग्रंथांत अहेत. ज्यात प्रत्येक ग्रहावरचे वेळेचे मोजमाप वेगळे असते असे सांगतात. (ब्रह्माकडे गेलेला राजा पिता आणि मुलगी पृथ्वीवर जातील तेव्हा ११६ मिलियन वर्षे लोटून गेली असल्याचे सांगतात) आईनस्टाईन याने याविषयी नंतरच्या काळात भाष्य केले. ब्रह्माने हात लावलेले झाडाचा आकार हा मानवी मेंदूसारखा असल्याचे लक्षात येते. हे झाड शिवलिंग जे न संपणार्‍या ऊर्जास्रोताचे प्रतीक आहे, त्याला चिकटून आहे. ब्रह्माच्या हातात बॅटरीसारखी (ऊर्जास्रोत) वैशिष्ट्यपूर्ण भूमीला न टेकणारी बॅग आहे.

येथे सायकलवर बसलेल्या माणसाची आकृतीही आहे. (अशा प्रकारच्या बॅग हातात घेतलेल्या आणि सायकलवर बसलेल्या माणसांच्या मूर्ती अन्य ठिकाणीही आढळतात. काही पाश्चात्त्यांनी हा दावा खोडून ही कलाकृती २० व्या शतकात कोरल्याचे म्हटले आहे.) (प्रवीण मोहन यांच्या चित्रफीतीवरून)


इटलीतील पिसाच्या मनोर्‍याहून अधिक झुकलेले वाराणसीतील रत्नेश्वर मंदिर !

वाराणसी, म्हणजेच काशी येथील मणिकर्णिका घाटाच्या अगदी समोर असलेले मंदिर हे रत्नेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. इटलीस्थित पिसाचा झुकलेला मनोरा (टॉवर) हा वास्तूकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही इमारत पायापासून ५ अंशांनी झुकलेली आहे. ५४ मीटर उंच असलेला पिसाचा झुकलेला मनोरा जगभर प्रसिद्ध आहे; मात्र वाराणसी येथील रत्नेश्वर मंदिर त्याच्या पायापासून ९ अंशांवर झुकलेले आहे आणि त्याची उंची १३.१४ मीटर आहे. यावरून मंदिराची अद्भुतता आणि दिव्यता लक्षात येईल.

वाराणसीतील गंगा घाटावरील सर्व मंदिरे वरच्या दिशेने बांधलेली आहेत, तर रत्नेश्वर मंदिर मणिकर्णिका घाटाच्या खाली बांधलेले आहे. घाटाच्या खाली असल्यामुळे हे मंदिर वर्षातील ८ मासांहून अधिक काळ गंगा नदीच्या पाण्यात बुडलेले असते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी मंदिराच्या कळसापर्यंत पोचते. मंदिर एरव्ही पाण्यात असते. त्यामुळे येथे पूजा होत नाही. २ महिनेच पूजा करू शकतो, अशी परिस्थिती असते; मात्र मंदिरात स्थापित शिवपिंडी मंदिराच्या भूमीपासून खाली असल्याने शिवपिंडीचे दर्शन होत नाही. मंदिराची वास्तू किंवा बांधकाम अतिशय सुंदर आहे. गुजराती पद्धतीचे मंदिराचे बांधकाम असून दगडांवरील कोरीव भाग काही यंत्रसामुग्री नसतांना कसा केला असेल, हे आश्चर्य आहे.

(पानाचे सर्व संदर्भ – विविध संकेतस्थळे, यू ट्यूब वाहिन्या)