दुबई ४ दिवसानंतरही ठप्प !

दुबईमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

नवी देहली – दुबईमध्ये १६ एप्रिलला सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. ४ दिवसानंतरही येथील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे येथे साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे दुबई ठप्प आहे. यामुळे दुबईहून देहलीला येणारी विमानांची अनेक उड्डाणे रहित करावी लागली आहेत. संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा तेथून प्रवास करणार्‍या भारतीय प्रवाशांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.