पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक संशयित अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी ‘सीबीआय’चे अन्वेषण अधिकारी सुभाष सिंग यांच्या विरोधात एक आवेदन प्रविष्ट केले आहे. त्या संदर्भात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी यांनी १८ एप्रिलला लेखी युक्तीवाद न्यायालयात सादर केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू असून या प्रकरणात पुढील सुनावणी १० मे या दिवशी होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ या दिवशी पुणे येथील महर्षि विठ्ठल शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ५ जणांच्या विरोधात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा एकूण रागरंग पहाता १० मे या दिवशी निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.