मुलींवर आघातच होणार नाही, अशी व्यवस्था पोलिसांनी निर्माण करणे अपेक्षित आहे !
‘देशभरात युवती किंवा विद्यार्थिनी यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तसेच लिंगभेदामुळे होणार्या हिंसेमुळे युवतींचा विकास, शिक्षण आणि आरोग्य यांची वाढ खुंटत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील शिक्षण मंत्रालयाने सरकारी विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालये येथील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींना त्यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्रातील शिक्षण मंत्रालय ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणा’योजनेच्या अंतर्गत निधी पुरवणार आहे. ‘गोवा समग्र शिक्षा’ योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.’ (१५.४.२०२४)