Namaz In British School : ब्रिटनमध्ये शाळेत नमाजपठणावर बंदीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

शाळेत शिकायचे असेल, तर शाळेचे नियम पाळावे लागणार असल्याचे न्यायालयाने सुनावले !

लंडन – ब्रिटनमधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात नमाजपठण करण्यावर बंदी घालण्यात आली होती. शाळेच्या या निर्णयाच्या विरोधात एका  मुसलमान विद्यार्थिनीने तेथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. उच्च न्यायालयानेे विद्यार्थिनीची याचिका फेटाळून लावत तिला ‘शाळेत शिकायचे असेल, तर शाळेचे नियम पाळावे लागतील’, असे सुनावले. ‘विद्यार्थिनी किंवा तिचे पालक यांना  शाळेचे कोणतेही नियम आवडत नसतील, तर ते शाळा सोडण्यास मोकळे आहेत’, असेही न्यायालयाने नमूद केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शाळेचे संस्थापक आणि मुख्य शिक्षिका कॅथरीन बिरबल सिंह यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि हा निर्णय म्हणजे सर्व शाळांचा विजय असल्याचे सांगितले.

हे प्रकरण ब्रिटनच्या ब्रेंटमधील ‘मायकेला कम्युनिटी स्कूल’शी संबंधित आहे. या शाळेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करण्यास सक्त मनाई आहे. या शाळेत ७०० मुले शिकतात. त्यांपैकी निम्म्याहून अधिक मुसलमान आहेत. या शाळेत नमाजावर बंदी असतांनाही ३० शाळकरी मुसलमान मुलांनी नमाजपठण केले. यानंतर शाळेने कडक कारवाई करत सर्वांना सक्त ताकीद दिली. यानंतर एका शाळकरी मुलीने शाळेत नमाजपठणावरील बंदी उठवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.

संपादकीय भूमिका

  • शाळेच्या आवारात नमाजपठण करण्याची मागणी करणे, हेच मुळात धर्मांधतेचे लक्षण आहे. त्यामुळे ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल बर्‍याच अंगाने महत्त्वपूर्ण आहे !
  • भारतातील कर्नाटकमधील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्याची मागणी केली होती. शाळांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र हे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे, हे लक्षात घ्या !