रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्यावर बालसाधिकेला स्वतःमध्ये जाणवलेले पालट

कु. श्रेया नलावडे

१. ‘मी रामनाथी आश्रमात आल्यावर कोणतीही प्रार्थना केली, तरी माझ्याकडून ती भाव ठेवून केली जायची आणि भावपूर्ण व्हायची.

२. मी घरी असतांना मला वाईट स्वप्ने पडत होती; परंतु जेव्हापासून मी रामनाथी आश्रमात आले, तेव्हापासून मला वाईट स्वप्ने पडणे बंद झाले आणि मला सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन होऊ लागले.

३. माझ्यामध्ये ‘आळशीपणा आणि चिडचिडेपणा’, हे तीव्र स्वभावदोष होते. मी आश्रमात आल्यावर ते बर्‍याच अंशी न्यून झाले. ‘माझ्यात चांगले गुण यावेत’, यासाठी गुरुदेव माझ्याकडून प्रयत्न करून घेत आहेत’, याची मला सतत जाणीव होत होती.

४. घरी माझे व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठीचे प्रयत्न अल्प होत होते; परंतु आश्रमात आल्यापासून ते पुष्कळ वाढले आहेत.’

– कु. श्रेया रवींद्र नलावडे (वय १३ वर्षे), घाटकोपर, मुंबई. (३.८.२०२२)