स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले ! |
सौ. भक्ती कुलकर्णी : परम पूज्य, ‘पूर्वी मी संगीताचा सराव करत होते; पण आता आतून मला ‘सराव करावा’ असे वाटत नाही. आता मला ‘साधनाच वाढवायला पाहिजे’, असे वाटते. ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे असे होते का ?’, हे मला कळत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे त्रासामुळे नाही. आपले एवढे साधक साधनेत पुढे गेले. त्यामध्ये संगीतातील किती आहेत ? साधना करणारेच पुढे गेले ना ? आयुष्यभर गायला, तरी स्वभावदोष दूर होतील का ? नाही ना ? मग ? ‘गायनाची आवड आहे, तरी आता ते नको वाटते. त्यापेक्षा ‘साधनाच करूया. स्वभावदोष निर्मूलन करूया’, असे वाटते’, ते चांगले झाले. फारच छान ! पुढे वाटल्यास संगीतातील साधना करता येईल.
|