बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे व्यापारी संकुलावर मुसलमानांचे आक्रमण !

पायपोसवर मक्केतील काबाचे चित्र असल्याचा आरोप

बलरामपूर (उत्तरप्रदेश) – येथील व्यापारी संकुलामध्ये मक्केतील काबाचे चित्र असलेल्या पायपोसची विक्री होत असल्याचा आरोप करत मुसलमानांच्या जमावाने त्यावर आक्रमण केले. ही घटना १२ एप्रिल या दिवशी ही घटना घडली. या जमावाने प्रक्षोभक घोषणाबाजी केली आणि दगडफेकही केली; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला. पोलिसांनी ५०-६० आक्रमणकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई चालू केली आहे. ‘सीसीटीव्ही’च्या चित्रीकरणाच्या आधारे आक्रमणकर्त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

१.  १२ एप्रिल या दिवशी मुसलमान समाजातील काही तरुण व्यापारी संकुलामध्ये गेले होते. तेथे मक्केच्या काबाचे चित्र असलेल्या पायपोसची विक्री केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

२. याविषयी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये काही मुसलमान तरुण व्यापारी संकुलाच्या व्यवस्थापकांवर पायपोस दाखवण्यासाठी दबाव टाकत असल्याचे दिसत आहे.

३. त्यानंतर हिंसक जमावाने व्यापारी संकुलावर दगडफेक केली. तसेच धर्मांधांच्या जमावाने ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला.

४. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच व्यवस्थापकाने उत्रौला पोलीस ठाण्यात माहिती दिली.

५. पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय दुबे आणि उपनिरीक्षक किसले मिश्रा पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोचले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.